हिंदुस्थानविरोधात माजी सरपंचाचे वादग्रस्त विधान; श्रीगोंद्यातील विसापूरमध्ये तणाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
visapur-bandh-2

सामना प्रतिनिधी । श्रीगोंदा

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर या ठिकाणी माजी सरपंच जब्बार अमीर सय्यद याने हिंदुस्थानच्या विरुद्ध वक्तव्य केल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीही कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करीता घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. जब्बार अमीर सय्यद याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी विसापूर गावात बंद पुकारला आहे. कडकडीत बंद ठेवून ग्रामस्थांनी बंदला समर्थन दिले आहे.

पुलावामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात हिंदुस्थानचे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तानविरोधात वातावरण तयार झाले आहे. दहशतवाद्यांना थारा देणाऱ्या पाकिस्तानला कायमची अद्दल घडवण्याची मागणी जनतेकडून सुरू असतानाच सय्यद सारख्या व्यक्तींकडून देशविरोधात वक्तव्य करण्यात आल्याने ग्रामस्थ चांगलेच संतापले आहेत. विसापूर गावच्या एका कार्यक्रमामध्ये सय्यद याने अक्षरशः अकलेचे तारे तोडले आहेत. ”हिंदुस्थान पाकिस्तानचं काही बिघडवू शकत नाही”, असे वादग्रस्त विधान त्याने केले. सय्यदच्या या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे गावामध्ये तीव्र पडसाद उमटू लागले. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.