मराठी भाषा दिनानिमित्त स्थानीय लोकाधिकार महासंघाची महत्त्वाची बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

येत्या 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन आहे. शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे यंदाही मराठी भाषा दिन मोठय़ा जल्लोषात साजरा केला जाणार आहे. त्या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या पूर्वतयारीची महत्त्वपूर्ण बैठक 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता दादर येथील शिवसेना भवन येथे आयोजित करण्यात आली आहे.

मराठी भाषा दिवसाच्या कार्यक्रमाबाबत महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर, महासंघाचे कार्याध्यक्ष, शिवसेना नेते, खासदार आनंदराव अडसूळ, महासंघाचे सरचिटणीस, शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई हे या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. महासंघ आणि संलग्न समित्यांमधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या बैठकीला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महासंघाने केले असल्याची माहिती महासंघाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.