लष्करप्रमुख बिपिन रावत यांची स्वदेशी ‘तेजस’मधून भरारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बेंगळुरूमध्ये सुरू असलेल्या पाच दिवसीय ‘एअर शो’दरम्यान लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी गुरुवारी स्वदेशी तेजस विमानातून भरारी घेतली. या विमानाची निर्मिती हिंदुस्थानची हत्यार निर्मिती कंपनी ‘हिंदुस्थान एयरोनॉटिक्स लिमिटेड’ने केली आहे. तेजसची सवारी करण्यापूर्वी जनरल रावत यांनी उपस्थित अधिकारी आणि प्रेक्षकांना हवेत हात उंचावून अभिवादन केले.

तेजसमधून भरारी घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जनरल रावत म्हणाले की, ‘तेजसमधून उड्डाणाचा अनुभव आयुष्यभर लक्षात राहिल. या घटनेचा मी साक्षिदार आहे आणि तेजसचे एव्हीओनिक्स खूप चांगले आहेत, तसेच त्याची शत्रूला लक्ष्य करण्याची ताकदही अफलातून आहे. हे एक आश्चर्यकारण विमान असून यामुळे हिंदुस्थानच्या वायूसेनेची ताकद वाढली आहे.’

याआधी बुधवारी तेजसला मिलिट्री एव्हिएशन रेग्यूलेटरकडून फायलन ऑपरेशन क्लिएरन्स मिळाले होते. तसे प्रमाणपत्र वायुसेनाप्रमुख बी.एस. धनोआ यांना एअर शोदरम्यान सोपवण्यात आले. त्यामुळे आता हिंदुस्थानची वायुसेना या विमानाचा वापर करण्यासाठी सज्ज झाली आहे.