
सामना प्रतिनिधी । इस्लामाबाद
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवरील आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच हिंदुस्थानकडून लष्करी कारवाई करण्याचा धोकाही पाकिस्तानला सतावत आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी लष्करप्रमुख कमर बाजवा यांच्या सल्लाने 2008 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदच्या जमात उल दावा आणि फलाह ए इन्सानियत या संघटनांवर बंदी घातली आहे. इमरान यांनी पाकिस्तानच्या सुरक्षा समितीचीही बैठक घेतली. त्याआधी त्यांनी बाजवा यांच्याशी चर्चा केली. बाजवा यांच्या सल्ल्यानुसार हाफीजच्या संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.





























































