LIVE #INDvAUST20 : अटीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा शेवटच्या चेंडूवर विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । विशाखापट्टणम

विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने तीन विकेटने रोमहर्षक विजय मिळवला. कांगारुंनी हिंदुस्थानचा शेवटच्या चेंडूवर पराभव करत दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. जसप्रीत बुमराहने 3 बळी घेत विजयासाठी शर्थ केली, परंतु अखेरच्या षटकात 14 धावांची आवश्यकता असताना उमेश यादवला कांगारुंच्या फलंदाजांना रोखता आले नाही.

  • मालिकेत 1-0 आघाडी
  • अटीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा शेवटच्या चेंडूवर विजय
  • ऑस्ट्रेलियाला शेवटच्या षटकात विजयासाठी 14 धावांची आवश्यकता
  • कांगारुंना सातवा धक्का, नाथन कुल्टर-नाईल बाद

  • कांगारुंना सहावा धक्का, हँडस्कोंब बाद

  • 12 चेंडूत 16 धावांची आवश्यकता
  • सामना रोमहर्षक स्थितीत
  • 18 चेंडूत 21 धावांची आवश्यकता
  • ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का, टर्नर शून्यावर बाद

  • ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का, शॉर्ट बाद

  • ऑस्ट्रेलियाचा तिसरा धक्का, मॅक्सवेल 56 धावांवर बाद

  • ग्लेन मॅक्सवेलचे तुफानी अर्धशतक
  • ऑस्ट्रेलियाची विजयाकडे वाटचाल, 47 चेंडूत 48 धावांची आवश्यकता
  • पाच षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 28 धावा
  • तीन षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या दोन बाद 3 धावा
  • ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, फिंच शून्यावर बाद

  • ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, स्टॉयनिस बाद

  • हिंदुस्थानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर मैदानात
  • धोनीच्या 37 चेंडूत नाबाद 29 धावा
  • हिंदुस्थानचे ऑस्ट्रेलियासमोर 127 धावांचे आव्हान
  • 20 षटकात हिंदुस्थानच्या 7 बाद 126 धावा
  • हिंदुस्थानला सातवा धक्का, उमेश यादव बाद

  • 16 षटकानंतर हिंदुस्थानच्या सहा बाद 104 धावा
  • हिंदुस्थानला सहावा धक्का, कृणाल पांड्या बाद

  • हिंदुस्थानच्या 100 धावा पूर्ण
  • चौदा षटकानंतर हिंदुस्थानच्या पाच बाद 95 धावा
  • लागोपाठच्या धक्क्याने हिंदुस्थानचा डाव संकटात, धोनीवर मदार
  • हिंदुस्थानचा पाचवा धक्का, कार्तिक बाद

  • हिंदुस्थानचा चौथा धक्का, अर्धशतकानंतर राहुल बाद

  • बारा षटकानंतर हिंदुस्थानच्या तीन बाद 91 धावा
  • के.एल. राहुलचे अर्धशतक, टी-20 कारकीर्दीतील पाचवे अर्धशतक

  • दहा षटकानंतर हिंदुस्थानच्या तीन बाद 80 धावा
  • हिंदुस्थानला तिसरा धक्का, पंत तीन धावांवर बाद

  • फिरकीपटू झंपाने घेतला दुसरा बळी
  • हिंदुस्थानला दुसरा धक्का, विराट 24 धावांवर बाद

  • आठ षटकानंतर हिंदुस्थानच्या एक बाद 65 धावा
  • हिंदुस्थानच्या 50 धावा पूर्ण
  • विराट कोहली, लोकेश राहुलची धडाकेबाज फलंदाजी
  • सहा षटकानंतर हिंदुस्थानच्या एक बाद 49 धावा
  • चार षटकानंतर हिंदुस्थानच्या एक बाद 26 धावा
  • हिंदुस्थानला पहिला धक्का, रोहित शर्मा 5 धावांवर बाद

  • दोन षटकानंतर हिंदुस्थानच्या बिनबाद 12 धावा
  • पहिल्या षटकानंतर हिंदुस्थानच्या बिनबाद एक धावा
  • सामना सुरू, सलामीवीर रोहित शर्मा व लोकेश राहुल मैदानात उतरले
  • तीन फिरकीपटूंसह हिंदुस्थान मैदानात
  • पहिल्या टी-20 साठीचा हिंदुस्थानचा अंतिम 11 खेळाडूंचा संघ

  • पहिल्या टी-20 साठी प्रेक्षकांची तुफान गर्दी

  • नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

  • टीम इंडियाचे पारडे जड
  • विशाखापट्टणम येथे होणार सामना
  • या सामन्यासाठी टीम इंडियाचा कसून सराव सुरू आहे

  • हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज पहिला टी-20 सामना होणार आहे.