
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
जम्मू-कश्मीरच्या ‘विशष दर्जा’शी संबंधित कलम 35 ए रद्द करण्याच्या मागणीसाठी दाखल झालेल्या याचिकेवर त्वरित सुनावणी घेण्याची मागणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांनी केली. त्यामुळे न्यायालयाने ही सुनावणी 26-28 फेब्रुवारीदरम्यान घेण्याचे निश्चित केले. दरम्यान, या मुद्दय़ावरून वातावरण तापू लागले आहे.
- 35 ए कलमाला 1954 सालात कलम 370 अन्वये कश्मीरला देण्यात आलेल्या विशेष अधिकाराअंतर्गत जोडले गेले होते. आता 35 ए कलमाच्या वैधतेला आव्हान देण्यात आले असून ते कलम हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कलम 370 राज्यघटनेतून हटवण्याची मागणी तर त्या आधीपासून होत आली आहे.
- लोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकार कलम 35ए या मुद्दय़ावर कठोर भूमिका घेण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. कलम 370 ला भाजपचा विरोध पूर्वीपासूनच आहे. मात्र ते कलम हटविण्यास जेडीयू, अकाली दल या भाजपच्या मित्रपक्षांचाच विरोध आहे.
- ए कलम आहे तरी काय?
35ए कलमामुळे इतर राज्यांतील कोणीही नागरिक जम्मू-कश्मीरमध्ये मालमत्तेची खरेदी करू शकत नाही.
इतर राज्यांतील व्यक्ती जम्मू-कश्मीरमध्ये कायम स्थायिक होऊ शकत नाही.
कश्मीरमधील कुण्या मुलीने राज्याबाहेरच्या व्यक्तीशी लग्न केले तर त्या मुलीलाही कश्मीरमधील संपत्तीवरील अधिकार गमवावा लागतो. - 35 ए कलम रद्द करण्यात आल्यास कश्मीर खोऱयात अरुणाचल प्रदेशहून वाईट स्थिती निर्माण होईल. केंद्र सरकारने जम्मू-कश्मीरमध्ये निवडणूक घेण्याकडे लक्ष द्यावे. जनतेलाच काय तो निर्णय घेऊ द्यावा. नवे सरकार कलम 35ए च्या रक्षणालाच प्राधान्य देईल.
ओमर अब्दुला, नेते, नॅशनल कॉन्फरन्स - कलम 35 ए ला धक्का लावून आगीशी खेळू नका. त्याने 1947 नंतर जे घडले नाही ते घडेल. जबरदस्तीने ते कलम हटवायचा प्रयत्न झाला तर कश्मीरचे लोक तिरंग्याऐवजी कोणता झेंडा हाती घेतील हे सांगता येत नाही.
मेहबुबा मुफ्ती, माजी मुख्यमंत्री

























































