बालाकोटमधे बनत होते मानवी बॉम्ब, म्हणून हिंदुस्थानने केला Air Strike

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाकिस्तानच्या बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदचा अड्डा म्हणजे मानवी बॉम्ब बनवण्याची फॅक्ट्री होती. याच अड्ड्यातून तयार झालेल्या क्रूर आणि कट्टर दहशतवाद्यांना हिंदुस्थान, अफगाणिस्थान, इराण आणि बलूचिस्थानमध्ये पाठवले जात होते. म्हणून हिंदुस्थानने ‘मिराज 2000’ बनावटीचे लढाऊ विमानांचा वापर करून हा अड्डा उद्ध्वस्त केला.

बालाकोटमधे जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानी गुप्तहेर संस्था (आयएसआय) आणि पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने ट्रेनिंग दिले जात होते. गेल्या वर्षी बालाकोटमधून जवळपास 225 दहशतवाद्यांनी कश्मिरमध्ये घुसखोरी केली होती. हिंदुस्थानी सुरक्षा यंत्रणांच्या सूत्रांच्या माहितीनूसार लवकरच येथून 35 ते 40 आत्मघाती दहशतवादी हिंदुस्थानात घुसण्याच्या तयारीत होते.

हिंदुस्थानच्या गुप्तचर यंत्रणा आणि तिन्ही दलाच्या उत्कृष्ट नियोजनाने हिंदुस्थानने Air Strike करून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर देत हा अड्डा उधवस्त केला. पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानने 12 दिवसातच पाकिस्तानला जबरदस्त दणका देत बदला घेतला.