गोळीबार प्रकरणी पाच जणांवर मोक्का, सहार पोलीस करणार पुन्हा क्राइम सीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अंधेरी पूर्व येथे कॉन्ट्रक्टर वर गोळीबारप्रकरणी सहार पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. त्या पाचही जणांना विरोधात सहार पोलिसांनी मोक्काअंतर्गत पुन्हा अटक केली.

सहार गाव परिसरात मुख्तार शेख राहतो. तो छोटी-मोठी बांधकामाची कंत्राटे घेतो. 19 जानेवारीला मुख्तार हा सहार गाव येथे आला होता. तेव्हा मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी मुख्तारच्या दिशेने गोळीबार केला. सुदैवाने त्या गोळीबारात मुख्तार बचावला होता. गोळीबारप्रकरणी अतिरिक्त आयुक्त मनोज शर्मा, परिमंडळ 8 चे उपायुक्त अनिल कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहार पोलिसांनी तपास केला. तपास करून विकास शर्मा, दर्शन शेट्टी, महेश वीरबहादूर सिंग, जावेद शेख आणि कुंदन ऊर्फ सलामुद्दीन झुरा खानला अटक केली होती. त्या पाचही जणांवर मुंबईमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्या पाचही जणांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रक अधिनियम 1999 (मोक्का) नुसार अटक केली.