
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
विंग कमांडर अभिनंदन शत्रू राष्ट्रात जाऊनही स्वगृही सुखरुप परत आले. परंतु पाकड्यांनी हिंदुस्थानी पायलट समजून स्वतःच्याच सैनिकाला ठेचून मारले आहे. शाहाजुद्दिन असे या दुर्दैवी पाकिस्तानी सैनिकाचे नाव आहे. शाहाजुद्दीन यांचे F-16 विमान नौशेरा विभागात कोसळले. त्यानंतर उपस्थित पाकिस्तानी नागरिकांनी त्याला ताब्यात घेतले आणि हिंदुस्थानी सैनिक समजून चोप दिला. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे.
जेव्हा विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात सापडले तेव्हा पाकिस्तानने दोन हिंदुस्थानी सैनिक ताब्यात असल्याचा दावा केला होता. परंतु हिंदुस्थानने आपला एकच कमांडर बेपत्ता असल्याचे म्हटले होते. हा दुसरा कमांडर पाकिस्तानी असल्याचे नंतर लक्षात आले. परंतु वेळ निघून घेली होती आणि विंग कमांडर शाहाजुद्दिन यांचा मृत्यू झाला होता. शाहाजुद्दिन याचे विमान कोसळल्यानंतर तो सुखरुप पॅराशूटने पाकव्याप्त कश्मीरमधील नौशेरा भागात उतरला. तिथल्या जमावाने त्याला हिंदुस्थानी सैनिक समजून मारहाण केली. नंतर जखामी अवस्थेत त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दोन्ही विंग कमांडरचे आयुष्यही सारखे आहे. दोघांनाही सैन्याचा वारसा आपल्या वडिलांकडून मिळाला. तर दोघेही देशाच्या वायू दलातच कार्यरत होते. फक्त शत्रू राष्ट्राच्या ताब्यात राहून अभिनंदन सुखरूप परत आले, तर शहाजुद्दिन स्वतःच्या लोकांकडून मारले गेले.




























































