जम्मू-कश्मीर येथील उधमपूरमध्ये बस दरीत कोसळून 6 ठार 38 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीर येथील उधमपूरमध्ये शुक्रवारी रात्री बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात सहा जण ठार झाले आहेत. या दुर्घटनेत 38 जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील सुरिंसरहून श्रीनगर येथे ही बस प्रवास करत होती. उधमपूर येथे एका घाटातून जातेवेळी बस दरीत कोसळली आणि हा भयंकर अपघात झाला. या घटनेत पाच जण जागीच मृत्युमुखी पडले तर एका जखमीने रुग्णालयात प्राण सोडले. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.