गोरेगावमध्ये युद्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी।  मुंबई

 मुंबईवर अतिरेकी हल्ला झाल्यास त्याला सडेतोड उत्तर कसे द्यायचे याचे अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिक रविवारी गोरेगावच्या राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी करून दाखवले.

अतिरेकी पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसल्यास झटपट कारवाई करून त्यांना कसे हुसकावून लावायचे हा थरारही जवानांनी दाखवला. जवानांची ही धाडसी कारवाई बघण्यासाठी यावेळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.