महाशिवरात्रीनिमित्त महाकुंभमेळ्यात फडणवीसांची डुबकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cm-in-mahakumbha

सामना ऑनलाईन । प्रयाग

प्रयाग येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवित्र स्नान केले. यावेळी वंदे मातरम अशा घोषणा दिल्या जात होत्या.

महाकुंभमेळ्यात येऊन, पवित्र नदीत स्नान केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. हा हिंदूंचा अत्यंत पवित्र आणि आस्थेचा उत्सव आहे. यंदा गंगा नदी अधिक स्वच्छ दिसत असल्याचे आणि उत्कृष्ट आयोजन असल्याचे सांगत फडणवीस यांनी योगी सरकार आणि केंद्र सरकारचे कौतुक केले.