
सामना प्रतिनिधी। मालवण
वेंगुर्ले दाभोली येथील दाभोलकर परिवाराच्या वतीने दिला जाणारा कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री आदर्श क्रीडा कार्यकर्ता हा जिल्हास्तरीय पुरस्कार मसुरे येथिल राज्यस्तरीय शुटिंगबॉल खेळाडू व पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांना वेंगुर्ले वायंगणी येथे माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते नुकताच वितरित करण्यात आला. शाल श्रीफळ, मानपत्र, सन्मान चिन्ह आणि रोख रकम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
दाभोलकर कुटुंब हे समाज सेवा करणारे कुटुंब असून या कुटुंबाचा आदर्श आज सर्व समाजाने घेणे जरुरीचे आहे. गेली अनेक वर्षे या कुटुंबाने माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रोसाहन दिले आहे. हे मोलाचे आहे हा पुरस्कार माझ्या जीवनातील सर्वात मोठा असा पुरस्कार आहेअसे मत दत्तप्रसाद पेडणेकर यांनी सत्कारास उत्तर देताना व्यक्त केले. या वेळी माजी सभापती आबा कोंडास्कर, सरपंच वायंगणी सुमन कामांत, आंतरराष्ट्रीय शुटिंगबॉल पंच अशोक दाभोलकर,माजी सभापती दीपक नाईक, उपसभापती स्मिता दामले,कासव संवर्धन अभ्यासक नागेश दफ्तरदार, हर्षद साळगावकर, विद्याधर सुतार,शिवसेना तालुका प्रमुख बाळा दळवी, कुमार खानोलकर,शशी गावंडे,सुनील गावडे,एल आर गवस आदी उपस्थित होते.
राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पेडणेकर यांनी नेटमन म्हणून पाच वेळा प्रतिनिधित्व केले होते. तसेच हॉलीबॉल, शूटिंग बॉल, कॅरम स्पर्धाच्या विविध स्पर्धांना पंच म्हणून तसेच स्पर्धा आयोजनामध्ये महत्वाची भूमिका पेडणेकर बजावत असतात. दत्तप्रसाद पेडणेकर यांच्या निवडी बद्दल उदोजक दीपक परब, उदोजक दीपक सावंत, समाजसेवक बाळासाहेब गोसावी, संग्राम प्रभुगावकर, सरोज परब, गायत्री ठाकूर, लक्ष्मी पेडणेकर, जयवंत परब, सुदाम परब, श्रीकांत सावंत, शिवराज सावंत यांनी अभिनंदन केले आहे. पेडणेकर यांना यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.





























































