1 / 4
गेला काही काळ इंटरनेट गेमिंग जगात धुडगूस घालणाऱ्या मोमो चॅलेंज या घातक खेळातली भयंकर चेहऱ्याची बाहुली कोणी बनवली असा प्रश्न अनेकांना पडला होता. या बाहुलीचा निर्माता सापडला असून केअसुके ऐसो असं त्याचं नाव आहे. मात्र ऐसो यानेच ती आता बाहुली नष्ट केल्याची माहिती दिली आहे.
मोठ्या बटबटीत डोळ्यांची आणि हडकलेल्या चेहऱ्याच्या या बाहुलीच्या भीतीने हा गेम खेळणाऱ्या काही जणांनी आत्महत्याही केल्या. ही बाहुली जपानी दंतकथांमधील 'उबुम' नावाच्या एका हडळीवरून प्रेरित होती.






























































