मॅक्सिकोत नाईट क्लबमध्ये गोळीबार, 15 ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। मॅक्सिको

मॅक्सिकोतील एका नाईटक्लबमध्ये टोळक्याने केलेल्या गोळीबारात 15 जण ठार झाले असून 7 हून अधिकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. शनिवारी पहाटे तीन गाड्यांमधून आलेले हे टोळके सॅलेमांका येथील ला प्लाया मॅन्स क्लबमध्ये घुसले होते. क्लबमध्ये प्रवेश करताच त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात 15 जण जागीच ठार झाले तर 7 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ज्या भागात ही घटना घडली ते इंधन चोरीसाठी कुख्यात आहे. दरम्यान,याप्रकरणी  पोलीस अधिक तपास करत आहेत.