1 / 6
अभिनेत्री सई ताम्हणकरने फेब्रुवारी महिन्यात सोशल मीडियावरून ती डिजीटल डिटॉक्सवर जात असल्याचे जाहीर केले. एक महिना डिजीटल डिटॉक्सवर गेलेल्या सईने या दरम्यान पाँडेचरीला जाऊन सचिन कुंडलकरांच्या आगामी सिनेमाचे चित्रीकरण केले.
नुकतीच सई पाँडेचरीवरून मुंबईत परत आली आणि सोशल मीडियावरही परतली. सोशल मीडियावर परतताच सईने एक छान ‘क्लासी बॉस बेब’ फोटोशूट केले.
सई परतल्यावर सोशल मीडियावरून चाहत्यांशी संवाद साधताना म्हणाली, “हो, मी आता पाँडेचरीवरून आणि सोशल मीडिया डिटॉक्सवरूनही एका महिन्यांनी मुंबईत परतलेय. माझ्या सोशल मीडिया डिटॉक्सचा मला शुटिंगला खूप फायदा झाला. चाहत्यांशी रोजच्या रोज संपर्कात असण्याची सवय असल्याने मी त्यांना खूप मिस केले.
ह्या एका महिन्यात खूप काही घडलंय. मी पाँडेचरीत काय-काय केले ते लवकरच मी चाहत्यांसोबत सोशल मीडियावरूनही शेअर करेनच, असंही सई म्हणाली.
सईच्या ह्या सोशल मीडिया पोस्टलाही तिच्या चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.
फोटोशूटविषयी सई म्हणते, “फोटोशूट करणं, किंवा शुटिंग करणं हा माझ्या रोजच्या आयुष्याचा भाग आहे. आता डिजीटल डिटॉक्सनंतर मी पून्हा नव्या जोमाने परतलीय. परतताना, लक्षात येतंय, की, सोशल मीडिया हा आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग असला तरीही कधीतरी ह्यातून ब्रेक घेऊन आयुष्यातले नव्या अनुभवांना सामोरे जाणे गरजेचे आहे.”





























































