हवाई हल्ल्यात मुंगीसुद्धा मेली नाही; हरिभाऊ राठोड यांचे भयंकर वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। यवतमाळ

पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यानंतर बालाकोटवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात पाकिस्तानची एक मुंगीसुद्धा मेली नाही, असे भयंकर वक्तव्य एकेकाळी भाजपचे खासदार राहिलेले काँग्रेसचे विद्यमान आमदार हरिभाऊ राठोड यांनी सोमवीरी येथे केले. ते एका जाहीर सभेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई हल्ल्याचा मुद्दा तापवत भावनेचा खेळ मांडला असून त्यातून महत्त्वाचे ज्वलंत प्रश्न बाजूला फेकले जात आहेत, असा अरोपही त्यांनी केला.