तुम्ही 1991ची पुनरावृत्ती करा, आम्ही 99 ची करू! सुजय विखे यांचा पवारांना इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sujay-vikhe patil

सामना प्रतिनिधी, नगर

भाजप प्रवेशानंतर सुजय विखे यांचे नगरमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या निवासस्थानी जाऊन सुजय यांनी त्यांची भेट घेऊन निवडणुकीबाबत चर्चा केली. दरम्यान, तुम्ही 1991ची पुनरावृत्ती करा, आम्ही 99ची करू, असा शरद पवार यांना इशारा देत आता वेळ आली आहे सर्वांच्या टीकेला उत्तर देण्याची, असे सुजय विखे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

भाजप प्रवेशानंतर सुजय विखे यांचे आज नगर शहरात विखे समर्थकांसह शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱयांनी जोरदार स्वागत केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना 1991 मध्ये आम्ही स्व. बाळासाहेब विखे यांचा पराभव केला होता. आताही आम्ही येथे विरोधी उमेदवाराचा पराभव करू शकतो, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी केले होते. त्यावर आज सुजय विखे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.