न्यूझीलंड मशिद हल्ला- हल्लेखोरास हिंदुस्थानसह अनेक देशांबद्दल तिरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। ख्राईस्टचर्च

न्यूझीलंडमध्ये दोन मशिदींवर बेछूट गोळीबार करत 49 जणांना ठार करणारा हल्लेखोर ब्रेंटन टॅरेंट याने हल्ल्याआधी गुरुवारी फेसबुकवर एक 74 पानांच पत्र पोस्ट केल्याचं समोर आलं आहे. त्यात त्याने शरणार्थींबद्दल व त्यांच्यावरील हल्ल्याबद्दल लिहलं आहे.

या पत्रात त्याने तो ऑस्ट्रेलियातील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आल्याचे म्हटले आहे. तसेच मशिदींवर हल्ला करण्याचे कारणही त्याने त्यात सांगितले आहे. परदेशी आक्रमणकर्त्यांकडून हजारो नागरिकांची कत्तल झाली. त्याचा सूड म्हणूनच हा हल्ला करत असल्याचे ब्रेंटनने पोस्टमधील पत्रात स्पष्ट केले आहे. तसेच यात त्याने ब्रिविक समर्थकांशी संपर्क केल्याचेही म्हटले आहे. 22 जुलै 2011 साली ब्रिविक नॉर्वेची राजधानी असलेल्या ओस्लो शहरात एका कारबॉम्बस्फोटाने आठ लोकांना ठार केल्याचं म्हटले आहे. तसेच नंतर कट्टरपंथीय लेबर पार्टीतील युवा चालवत असलेल्या तळावरही बेछूट गोळीबार केला. ज्यात  69 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यासाठी 21 वर्षांची शिक्षा झाल्याचे त्याने पोस्टमध्ये सांगितले आहे.

ब्रेंटन याने हल्ल्याच्या दिवशी रात्रीच्या वेळी फेसबुकवर हल्ल्याची धमकी दिली होती. तसेच हल्ला लाईव्ह दाखवण्याचा शब्दही त्याने दिला. तसेच या हल्ल्यात जर जिवंत राहिलो नाही, तर सगळ्यांना अलविदा असेही त्याने या पत्रात म्हटले होते. पोस्टमधील पत्रात त्याने दोन्ही मशिदींची नावेही टाकली होती. एवढेच नाही तर या पोस्टची लिंक त्याने अनेक कट्टरपंथीय संघटना, टि्वटर व दहशतवादी विचारधारा असणाऱ्यांना ऑनलाईन पाठवली होती. त्यानंतर त्याने हेल्मॅटमध्ये कॅमेरा लावला व गाडीने मशिदीजवळ गेला. मशिदीत प्रवेश करण्यापूर्वीच त्याने लोकांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो परत गाडीजवळ आला व गाडीतून हत्यारं घेऊन तो पुन्हा गेला. त्याने तिथे नमाजसाठी आलेल्या नागरिकांवर बेछूट गोळीबार केला. दरम्यान याआधी ब्रेंटन पाकिस्तान आणि उत्तर कोरियातही गेला होता. त्याला हिंदुस्थान, चीन, टर्की, पाकिस्तान, रोम, अफ्रिका, टर्की व इतर अनेक देशांबद्दल द्वेष आहे. या देशातील काळ्या लोकांमुळेच गोऱ्यांना संधी मिळत नाहीत, असे त्याने म्हटले आहे.