LIVE : डॉ.भारती पवार आणि प्रवीण छेडा यांचा भाजपत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाइन । मुंबई

काँग्रेस नेते प्रवीण छेडा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या डॉ. भारती पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहेत. काँग्रेसमध्ये घुसमट होत असल्याचे सांगत प्रवीण छेडा यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. सुजय विखे पाटील,रणजीतसिंह मोहिते-पाटील यांच्यानंतर आता प्रवीण छेडा आणि भारती पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

  • निवडणुकीसाठी सगळ्यांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
  • सर्जिकल आणि एअर स्ट्राइकवर टीका करणाऱ्यांच्या राष्ट्रप्रेमाबाबत शंका उपस्थित होत आहे.
  • देशाचा विकास फक्त नरेंद्र मोदीच करू शकतात असा विश्वास जनतेत आहे.
  • काकडे यांचे कार्य लक्षात घेऊन त्यांना पश्चिम महाराष्ट्रात पक्षकार्य करण्याचे सांगण्यात आले आहे.
  • संजय काकडे काही कारणांमुळे पक्षावर नाराज होते. मात्र, आता त्यांची नाराजी दूर झाली आहे.
  • देशहित आणि राज्याच्या विकासासाठी या नेत्यांनी भाजपत प्रवेश केला आहे.
  • प्रवीण छेडा भाजपत स्वगृही परत आल्याने उत्तम नेता पक्षात परत आला आहे.
  • भारती पवार यांनी भाजपत प्रवेश केल्याने दिंडोरीमध्ये पक्ष मजबूत झाला आहे.
  • राजकारण आणि समाजकारणात त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला
  • भारती पवार यांची स्वतःची वेगळी ओळख आहे- मुख्यमंत्री
  • भाजप प्रवेशामुळे आपल्याला नवी उर्जा  मिळाली आहे. आता पक्षाच्या आदेशानुसार जनतेसाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
  • भाजप सरकारने केलेल्या विकासकामांमुळे प्रभावित होऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला
  • देशात आणि राज्यात भाजप सरकारकडून अनेक विकासकामे करण्यात येत आहेत- भारती पवार
  • व्यासपीठावर संजय काकडे यांचीही उपस्थिती
  • काँग्रेसमध्ये घुसमट होत असल्याचे प्रवीण छेडा यांनी सांगितले होते.
  • काँग्रेस नेते  प्रवीण छेडा यांनीही केला भाजपत प्रवेश
  • दिंडोरीतून भारती पवार यांना उमेदवारी मिळाली नसल्याने त्या नाराज होत्या.
  • मुंबईत पक्षाचा झेंडा हातात घेऊन झाला प्रवेश
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत डॉ. भारती पवार यांनी केला भाजपात प्रवेश