
सामना ऑनलाईन । नांदेड
नांदेडमधील मुदखेड येथे एका पोलीस उप निरीक्षकाला जमावाने शिवीगाळ करून धक्काबुक्की केली आहे. अनधिकृत कत्तलखान्यावर कारवाई केल्याच्या रागातून पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांना मारहाण करण्याचाही प्रयत्न झाला. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. या धक्काबुक्कीचा आणि शिवीगाळ होत असतानाचा व्हीडीयो व्हायरल झाला आहे. धर्मांध मुसलमानांच्या जमावाने मुदखेड पोलीस स्थानकातही गोंधळ घातला.
पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी 20 मार्च रोजी अनधिकृत कत्तलखान्यावर कारवाई केली होती तसेच अवैध कत्तलखाना चालवणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले होते. याच रागातून किनवट बाजारपेठ येथील कुरेशी गटाने शिंदे यांना एकटे गाठून त्यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मुदखेड पोलिसांनी या प्रकरणी 40 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.





























































