सावंत मंत्रीमंडळातील खाते वाटप जाहीर; पर्रिकर मंत्रीमंडळातील खाती कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पणजी

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मंत्रीमंडळातील खातेवाटपाला राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार  मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले.

मंत्रिमंडळातील खातेवाटपाची अधिसूचना शुक्रवारी संध्याकाळी कार्मिक खात्याकडून जारी करण्यात आली. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडे असलेली खाती समान ठेवण्यात आली आहेत.

मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे अर्थ, गृह, पर्सनल, उद्योग, खाण, वन, शिक्षण, पर्यावरण खाती आहेत. उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, वाहतूक, नदी परिवहन व संग्रहालय खाती देण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांच्याकडे नगर नियोजन, कृषी, पुरातत्त्व, कारखाने व बाष्पक खाते देण्यात आले आहे. मनोहर (बाबू) आजगावकर यांच्याकडे पर्यटन, क्रीडा, छापखाना खाते सोपवण्यात आले आहे.