
सामना ऑनलाईन । मुंबई
नगरमधून भाजपचे सुजय विखे-पाटील आणि काँग्रेसकडून संग्राम जगताप अशी लढत होणार असतानाच आता मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचे संजीव भोर यांनी जाहीर केले.
संग्राम जगताप आणि सुजय विखे–पाटील हे धनदांडगे असून शेतकरी, कष्टकरी, पिचलेल्या समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मी पुढे येत असल्याचे संजीव भोर यांनी सांगितले. समाजाच्या सर्क घटकातील लोकांचे मत आम्ही जाणून घेतले. प्रस्थापितांच्या किरोधात लढाई लढली पाहिजे, असे मत सर्क घटकातील लोकांकडून मिळाल्याचे भोर यांनी सांगितले.



























































