टाटा पॉवरचे अभियंते नौदलासाठी तयार करणार रडार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

वीजनिर्मिती आणि वीज वितरणाचे काम कारणार्‍या टाटा पॉवर या वीज कंपनीचे अभियंते आता हिंदुस्थानी नौदलासाठी थ्रीडी एअर सर्व्हेलन्स रडार तयार करणार आहेत. त्यासाठी संरक्षण मंत्रालय आणि टाटा पॉवरमध्ये 1200 कोटी रुपयांचा करार झाला आहे. टाटा पॉवरचे अभियंते वीजनिर्मिती आणि वितरणाबरोबरच विविध इलेक्ट्रिक उपकरणे बनवण्याचे काम करतात. त्या पार्श्वभूमीवर टाटा पावरने स्ट्रटेजिक इंजिनीयरिंग डिव्हिजन ही उपकंपनी सुरू केली आहे. सदर कंपनी ‘मेक इन इंडिया’अंतर्गत ओईएम इंद्रा सिस्टीम या स्पेनच्या कंपनीच्या सहकार्याने नौदलासाठी अत्यावश्यक असलेली थ्रीडी सर्व्हेलन्स रडार तयार करणार आहे. येत्या दहा वर्षांसाठी ही रडार पुरविण्याबाबत करार झाला आहे.