
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
भाजपचे खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे. भाजपने बिहारमधून त्यांचे तिकीट कापल्यानंतर ते महागठबंधनमध्ये सामील होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. त्यात सिन्हा यांनी मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली. त्यानंतर ते बिहारच्या महागठबंधनमध्ये सामील होणार नाही हे निश्चित झाले.
This is how things are paid in the same coin, that’s why it is called ‘master of situation’ Rahul Gandhi.
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) March 26, 2019
राहुल गांधी गरीबांना वर्षाला ७२ हजार रुपये देण्याचे जाहीरनाम्यात म्हटले होते. त्यावर सिन्हा यांनी हे मौकेपे चौका असल्याचे म्हटले होते. त्यावर भाजपने केलेल्या टीकेचा सिन्हा यांनी समाचार घेतला. आप करे तो रासलीला और हम करे तो कॅरेक्टर ढीला अशे म्हणून त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. काँग्रेस प्रवेशानंतर त्यांना पटना साहिबमधून उमेदवारी मिळू शकते.
Aap kare toh ‘raasleela’, baki kare toh ‘character dheela’! What is right for Peter, should be right for Paul, Sir. The people have welcomed this move & are very excited. Farmers loans have been waived as promised by them recently – in 3 different states.
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) March 26, 2019

























































