
विजय जोशी, नांदेड
सिडको येथील ओद्योगिक वसाहतीतील कोहिनूर ऑइल मिल येथील पॅकिंग सेक्शनला सकाळी सहाच्या सुमारास लागलेल्या आगीत कंपनीचे बरेच नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. सिडको लगत असलेल्या कोहिनूर ऑइल मिल येथील पॅकिंग सेक्शनला सकाळी सहाच्या सुमारास लागलेल्या आगीत कंपनीचे बरेच नुकसान झाले. घटनास्थळी नांदेड औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दल व नांदेड मनपाच्या दोन गाड्या तत्काळ आल्यामुळे होणारा अनर्थ टळला.



























































