हस्तलिखित पोचपावत्या स्वीकारू नका, ‘महावितरण’चे ग्राहकांना आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

‘महावितरण’चे वीज बिल भरल्यानंतर अनेक ठिकाणी हस्तलिखित पोचपावत्या दिल्या जातात. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येताच महावितरणने वीज बिलाची रक्कम ग्राहकाच्या खात्यावर जमा व्हावी म्हणून केंद्रीकृत संगणकीय प्रणाली सुरू केली आहे. यापुढे बिलाची रक्कम भरल्यानंतर ग्राहकांनी संगणकीकृत पोचपावतीचा आग्रह धरावा, हस्तलिखित पोचपावत्या स्वीकारू नयेत असे आवाहन केले आहे.