
सामना ऑनलाईन, मुंबई
वाढत्या उष्णतेमुळे माथेरानच्या राणीचा पारदर्शक ‘व्हिस्टाडोम कोच’ दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या डब्यातील वातानुकूलित यंत्रणेची क्षमता वाढवण्यासाठी तसेच काचेच्या छताला सन कंट्रोल फिल्म बसविण्याची कामे हाती घेतल्याने आणखी सात दिवस तरी पर्यटकांना पारदर्शक प्रवासासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.





























































