देशाला राजा महाराजा नव्हे तर चौकीदाराचीच गरज: पंतप्रधान मोदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मै भी चौकीदार’ हे प्रचार अभियान सुरू केले आहे. या कार्यक्रामात मोदी म्हणाले की, “देशाला राजा महाराजा नव्हे तर चौकीदाराची गरज आहे.”  तसेच जे लोक गणवेश घालतात, गळ्यात शिटी अडकवतात विरोधी पक्ष त्यांनाच चौकीदार समजतात परंतु जे लोक देशाची सेवा करतात तेच चौकीदार असतात” असेही मोदी यावेळी म्हणाले.

मोदी म्हणाले की, “बालाकोटवर एअर स्ट्राईक मी नाही केले. देशाच्या जवानांनी केले. आपल्या सुरक्षा दलाने केले. त्यासाठी आमच्याकडून त्यांना सॅल्यूट. पाकिस्तान वाटले की मी निवडणुकीच्या प्रचारात मग्न असेल तेव्हा मी काही करणार नाही.” परंतु आपल्यासाठी निवडणुका महत्त्वाच्या नसून देश महत्त्वाचा असल्याचे मोदींनी म्हटले.

नीरव मोदी आणि विजय मल्ल्यावर मोदी म्हणाले की, “ज्यांनी देशाला लुटले आहे त्यांच्याकडून पैन्‍ पै वसूल केली जाईल.” मै भी चौकीदार या अभियानातून ५०० हून अधिक क्षेत्राशी लोकांनी त्यांनी व्हिडीओ कॉन्फ़रन्सद्वारे संवाद साधला.