‘एमपीएससी’ने वन अधिकारी पदासाठी अपात्र ठरवल्याने फार्मसीचे हजारो विद्यार्थी नाराज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

वन अधिकाऱ्यांच्या पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) अपात्र मानल्याने राज्यातील फार्मसीचे हजारो विद्यार्थी नाराज आहेत. आवश्यक शैक्षणिक पात्रता असतानाही अपात्र ठरवले गेल्याने काही विद्यार्थ्यांनी न्यायालयाची दारे ठोठावली तर काही गेले अनेक महिने सरकारदरबारी पाठपुरावा करत आहेत. जे न्यायालयात गेले त्यांचे अर्ज भरून घ्या असे आदेश न्यायालयाने ‘एमपीएससी’ला दिले आहेत. इतर विद्यार्थ्यांबाबत मात्र सरकारलाच निर्णय घ्यायचा आहे, परंतु सरकारकडून अपेक्षित प्रतिसादच अद्याप मिळालेला नसल्याची खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

वन अधिकाऱयांच्या पदांसाठी ‘एमपीएससी’कडून दरवर्षी अर्ज काढले जातात. या पदासाठी शैक्षणिक निकष म्हणून बीएस्सी किंवा इतर अभ्यासक्रमांतील पदवी शिक्षणाची अट ठेवण्यात येते. फार्मसीचाही बहुतांश अभ्यासक्रम हा बीएसस्सीसारखाच आहे. तेसुद्धा पदवीधर आहेत. तरीसुद्धा या पदांसाठी फार्मसीवाल्यांना ग्राह्य धरले जात नाही. इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्यांना मात्र पात्र धरले जाते. त्यामुळे फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

फार्मसीच्या सात विद्यार्थ्यांनी या अन्यायाविरुद्ध महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे (मॅट) दाद मागितली. त्यावर गेल्या 23 मार्च रोजी मॅटने या विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घ्यावेत असे आदेश एमपीएससीला दिले. त्यावर इतर विद्यार्थ्यांनी एमपीएससीकडे संपर्क साधला. एमपीएससीने इतर विद्यार्थ्यांबाबत सरकारच निर्णय घेईल असे सांगितल्याची माहिती रणदीप भिसे या विद्यार्थ्याने दिली. एमपीएससीसह उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडेही रणदीप याने गेले अनेक महिने पाठपुरावा केला त्या विभागानेही सरकारकडेच बोट दाखवले असे त्याने सांगितले. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना वन अधिकारी पदासाठी का घेतले जाऊ शकत नाही या प्रश्नाचे उत्तर यापैकी कोणत्याही विभागाकडे नाही.

प्रथम सत्राची परीक्षा विद्यार्थ्यांच्या कारकीर्दीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे निकाल वेळेवर जाहीर करायला विद्यापीठाने प्राधान्य दिले आहे. सर्व महाविद्यालये कमीत कमी दीडपट मूल्यांकन करतील, असा मला विश्वास वाटतो.
-डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ