
सामना प्रतिनिधी । मारतळा
देशभरामध्ये सर्वञ गोवंश हत्याबंदी कायदा लागू असताना मंगळवारी मारतळा येथील आठवडी बाजारात खुलेआम गोवंशाचे मास विक्री करत असताना येथील हिंदुत्ववादी तरुणांनी तीन कसायास पकडून त्यांना मुदेमालासह उस्माननगर पोलिसांच्या स्वाधीन केले.
नांदेड हैदराबाद महामार्गावर असलेल्या मारतळा या गावात दर मंगळवारी आठवडी बाजार भरतो. याच आठवडी बाजारात ब-याच दिवसापासून इतर जनावरांच्या मांसाबरोबरच गोमांस व गोवंशीय प्राण्याचे मांस विक्री होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा होत असल्याची कुणकुण हिंदुत्ववादी तरुणांना लागली. मंगळवारी बौद्ध वस्तीत असलेल्या समाज मंदिर परिसरात सदर प्रकारचा प्रकार चालत असल्याचे पाहून गोवंशाचे मांस सरास विक्री करणाऱ्या तीन कसायास रंगेहाथ पकडून गोमांस विक्री करत असलेल्या खोलीतच डांबले. तसेच उस्माननगर पोलीसांशी संपर्क साधून सदर प्रकाराबद्दल माहिती दिली. त्यानंतर शिराढोण येथील पशुधन विकास अधिकारी श्रीनिवास यांनी तपासणी करून अहवाल पोलिसांना सादर केल्यानंतर उस्माननगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक ञ्यंबक गायकवाड व त्यांच्या सहकार्यानीं घटनास्थळावरून 50 किलो गोमांस, हत्यारे जप्त केली अब्दुल अहमद हूसेन, नयुम उस्मान कुरेशी व महमद अजीम महमद कादर कुरेशी तिघेही रा. उस्माननगर ता. कंधार यांना महाराष्ट्र पशुसंरक्षण कायद्यान्वे घटनास्थळी अटक करून पोलीस ठाण्यात नेले.





























































