
सामना प्रतिनिधी । उरण
देशाचे भवितव्य घडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वच बाबतीत आघाडीवर आहेत. देशाच्या विकासासाठी मोदी यांना साथ देण्यासाठी मावळच्या शिवसेना-भाजप-रिपाईच्या सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी उरणमधील प्रचार सभेतून कले. उरण -पनवेलमधे विकास कामे करण्यात शिवसेना -भाजप आघाडीवर आहे. या विकास कामांच्या जोरावर बारणे यांना उरण-पनवेलमधून 30 हजाराची आघाडी मिळवून देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.मावळ लोकसभा निवडणुकीतील शिवसेना-भाजप-रिपाई महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार मेळावा मंगळवारी उरण येथे आयोजित करण्यात आला होता.
मेळाव्यात मार्गदर्शन करताना ठाकूर यांनी केंद्र व राज्यातील शिवसेना-भाजप सरकारने उरण-पनवेल विधानसभा मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहनही त्यांनी केले. खासदार श्रीरंग बारणे यांनी उरण पनवेल शेतकऱ्यांचे प्रश्न मोदी सरकार आणि नितीन गडकरी यांनी सोडवले आहेत. माझा कुणीही दादा परदादा राजकारणात नाहीत. मी जनेतेचे काम केले आहे. विकास केला आहे. त्यामुळे घराणेशाही जपाणाऱ्या पार्थचा पराभव करण्याचे आवाहन त्यांनी केले.
जेएनपीटीच्या कामगार वसाहतील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित मेळाव्यात खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, शिवसेना जिल्हा प्रमुख, आमदार मनोहर भोईर, भाजप जिल्हाध्यक्ष, सिडकोचे अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हासंपर्क प्रमुख दत्ताजी दळवी, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, शिवसेनेचे सल्लागार बबन पाटील, जेएनपीटी ट्रस्टी महेश बालदी,दिनेश पाटील,रवींद्र पाटील, भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर,शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर, बी.एन. डाकी, गणेश शिंदे,भाजप शहर अध्यक्ष नगरसेवक कौशिक ठाकूर, सेना-भाजप-रिपाईचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



























































