
सामना ऑनलाईन, केंद्रापारा
ओडिशातील केंद्रापारा जिह्यात मतदान केंद्रात वीज खंडित झाल्यावर यावेळी पारंपरिक केरोसीन कंदिलाऐवजी सौरकंदील वापरण्याची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक कार्यालयाने ही माहिती दिली. पर्यावरणस्नेही असलेले सौरकंदील केंद्रापारा जिह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांतील 1392 मतदान केंद्रांत पुरेसा प्रकाश देतील असे सांगण्यात आले. आम्ही केरोसीनऐवजी सौरऊर्जेवर चालणारे कंदील वापरण्याचा निर्णय घेतला असे केंद्रापाराचे जिल्हाधिकारी दासरथी पाणिग्रही यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्रापारा जिह्यात केंद्रीय वीज मंडळाने नियमित वीजपुरवठा करावा असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. ओडिशात 11, 18, 23 आणि 29 एप्रिलला लोकसभा आणि विधानसभेसाठी मतदान घेतले जाणार आहे.

























































