चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, 15 दिवसातील तिसरी घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रम्हपुरी तालुक्यातील नवेगाव जंगलात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. अनुसया बनकर (50) असे मृत महिलेचे नाव असून पहाटेच्या सुमारास जंगलात मोहफुल वेचण्यासाठी गेली असता वाघाने तिच्यावर हल्ला केला. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 15 दिवसात वाघाच्या हल्ल्याची ही तिसरी घटना आहे.

चंद्रपूरात 27 मार्च रोजी ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा रामपुरी (मेंडकी) येथील जानकीराम शंकर भलावी (50) जंगलात मोहफुल गोळा करण्यासाठी गेला असता वाघाने केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. तर 29 मार्च रोजी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या रानतळोधी गावातील मंगलाबाई नन्नावरे (55) सरपण वेचण्यासाठी जंगलात गेल्या असता वाघाने केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्याचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.