
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
जगातील लोकप्रिय मॅसेंजिंग ऍप व्हॉट्सऍप दिवसागणिक अधिक मजेशीर आणि सोपं होऊ लागलंय. व्हॉट्सऍप वापरणं पहिल्यापेक्षा अधिक चांगला अनुभव ठरावा, यासाठी सातत्याने कंपनीकडून नवनवीन फीचर लाँच केले जातात. त्यातच आता व्हॉट्सऍप बिझनेस ऍप लाँच करण्यात आले आहे. या फीचरचा छोटा व्यापार्यांना खूप फायदा होणार आहे. छोटे व्यापारी लँडलाइन नंबरवरून व्हॉट्सऍप चालवू शकतील. या फीचरची खास बाब म्हणजे युजर्सचा पर्सनल नंबर दुसर्या कुणालाही शेअर होणार नाही. हे फीचर सुरू करण्यासाठी आधी व्हॉट्सऍप बिझनेस ऍपला मोबाईल किंवा लॅपटॉप, कॉम्प्युटरवर डाऊनलोड करा. त्यानंतर कंट्री कोड आणि मोबाईल नंबर वा लँडलाइन नंबरही टाकू शकतो. त्यानंतर तुमच्या नंबरचे व्हेरिफिकेशन होईल आणि हे फीचर सुरू होईल.


























































