
सामना प्रतिनिधी। नगर
डी.एड., बीए.बी.एड. किंवा त्यापेक्षा अधिक पदवी प्राप्त करुन पदोन्नतीवर गेलेल्या शिक्षकांना वरीष्ठ पदासाठी सेवा जेष्ठतेनुसार पदोन्नतीचा मार्ग नागपुर खंडपीठाच्या निकालाने मोकळा झाला आहे. अशी माहिती शिक्षक नेते सुनिल गाडगे यांनी दिली.
उच्च न्यायालय नागपुर खंडपीठाने निकालाव्दारे पुन्हा नियुक्ती दिनांक व अखंड सेवा यानुसार पदोन्नतीवर शिक्कामोर्तब करुन शिक्षकांना दिलासा दिला आहे. राज्यातील स्थानिक खाजगी अनुदानित शिक्षण संस्थामध्ये प्रारंभी कमी गुणवत्तेवर कर्मचार्याची नियुक्ती केली. सेवा कालावधीमध्ये एखाद्या कर्मचार्याने, शिक्षकाने सेवा कालावधीमध्ये शिक्षण संस्थेची परवानगी घेऊन उच्च पदवी प्राप्त केली तर त्याला उच्च पदवीनुसार वरिष्ठ पदोन्नती दिली जाते. पण जेव्हा मुख्याध्यापक, पर्यवेक्षक किंवा अन्य पदवी किंवा पदोन्नतीची पदे भरताना त्यांना त्यांची पूर्वीची नियुक्ती गृहित न धरता त्यांच्या नंतर पदवी घेतलेला शिक्षक ग्राह्य धरण्याची खाजगी शिक्षण संस्थांची पद्धत होती. याविरोधात खाजगी शिक्षण संस्थेतील शिक्षणांची न्यायलयात दाद मागीतली होती. न्यायालयाने शिक्षकांना दिलासा देत पुढील काळात डी.एड., बीएड., पदवी प्राप्त शिक्षक नेमणुक तारखे पासून पात्र राहणार आहेत, अशा निकाल उच्च न्यायालय नागपुर खंडपीठाने दिला आहे. 25 मार्च 2019 रोजी डब्ल्यु.पी. 1391/2016 निकालाव्दारे नागपुर खंडपीठाने निकाल दिला आहे.
यासंदर्भात शिक्षक भारती संघटनेची तातडीची सहविचार सभा शिक्षक भारती कार्यालयात शिक्षक नेते सुनिल गाडगे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब आनंदराव जगताप, सचिव विजय एकनाथ कराळे, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप बोलताना म्हणाले कि, शिक्षकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडुन त्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम शिक्षक भारती संघटना नेहमी करत आहे. विविध आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाला जाग येई पर्यंत आंदोलने करीत शिक्षक भारतीने आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, राज्यसचिव सुनिल गाडगे यांच्या मार्गदर्शनाने आज महाराष्ट राज्यामध्ये शिक्षकांचे विविध प्रश्न निकाली काढले आहेत. यापुढेही एकच मिशन, जुनी पेन्शन तसेच शिक्षकेतर कर्मचार्यांना शिक्षक पदावर पदोन्नत्ती देण्यासंदर्भात लढा लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर दिला जाईल. असे सांगितले.






























































