आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात विषाणू, बुरशी; नासाला चिंता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। वॉशिंग्टन

पृथ्वीवर रुग्णालयांमधील किंवा जिममधील लॅबोरेटरीजमध्ये असणारे विषाणू आणि बुरशी आता थेट अंतराळात असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातही आढळल्याचे नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने सांगितले आहे. यामुळे अंतराळात शास्त्रज्ञांना आरोग्यविषयक धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे नासाच्या या संशोधकांमध्ये एका हिंदुस्थानी संशोधकाचाही समावेश आहे.

नासाच्या संशोधकांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये आढळलेल्या सूक्ष्म विषाणू आणि बुरशीची पूर्ण माहितीच जमा केली आहे. अंतराळात बराच काळ वस्तू राहिल्यामुळे त्यात बुरशी किंवा सूक्ष्म जंतू निर्माण होऊ शकतात. ही बुरशी अंतराळवीरांना अंतराळयानातही दिसते, असेही नासाने नमूद केले आहे. पृथ्वीवरही बराच काळ बंद असलेल्या ठिकाणी हे विषाणू तयार होतात. त्यावर सध्या तरी पूर्ण इलाज नाही, असे नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीचे संशोधक कस्तुरी वेंकटेश्वरन यांनी सांगितले.