‘पालखी’ कॅबमध्ये मिळणार अत्याधुनिक सुविधा, 7 मेपासून प्रवाशांच्या सेवेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

प्रवाशांना सुरक्षित आणि दर्जेदार वाहतुकीची सुविधा देणारी ‘पालखी’ कॅब 7 मेपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. 30 एप्रिल रोजी ठाण्यात या सेवेचे उद्घाटन होणार असून पहिल्या टप्प्यात 20 हजार टॅक्सी धावणार आहेत.

प्रवाशांना एकाच ऍपच्या माध्यमातून विविध सेवा देण्याच्या उद्देशाने  मुंबई, पनवेलपर्यंत ‘पालखी’ कॅब सुरू करण्यात येत असल्याची माहिती संस्थापक-सीईओ प्रफुल शिंदे यांनी सांगितले. ही सेवा देण्यासाठी नेमण्यात येणारे ड्रायव्हर हे परदेशी भाषा येणारे असतील. यामुळे पर्यटनालाही चालना मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासाठी ड्रायव्हरना ठाण्यात ट्रेनिंगही सुरू करण्यात आले आहे. मुंबईसह ठाणे, नागपूर, सातारा, नाशिक, नगर, पुणे आदी ठिकाणी ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

ऍप एक, सेवा अनेक

  • ‘पालखी’ ऍपच्या माध्यमातून प्रवासी सेवेबरोबरच टिफिन सेवाही दिली जाईल. विशेष म्हणजे ही सेवा देण्यासाठी बचत गटांची मदत घेण्यात येईल. त्यामुळे महिलांनाही रोजगार मिळणार आहे.
  • महिला सुरक्षेसाठी कॅबमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येईल. याशिवाय ई-कॉमर्स सुविधा, ‘24/7’ सरचार्ज फ्री सर्व्हिस देण्यात येईल.