
सामना ऑनलाईन। मुंबई
डहाणू आणि तलासरीला आज सकाळी भूकंपाचे धक्के बसले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा भूकंप किती रिश्टर स्केलचा होता याबद्दल अजून काही सांगण्यात आलेले नाही.
मात्र भूकंपाच्या भीतीने अनेकजण घर सोडून रस्त्यावर धावले. दरम्यान, यात कुठलीही हानि झालेली नाही.























































