Vote India गुगलचं डुडलद्वारे मतदारांना आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
google-vote

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

Lok Sabha Election 2019 च्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली. मतदानाचा अधिकार सर्वांनी बजावावा यासाठी सरकार, प्रशासनासोबतच सामाजिक संस्था, कलाकार पुढे आल्याचे नेहमी पाहायला मिळते. मात्र आता व्हर्चुअल वर्ल्डमध्ये जगणाऱ्या युवा पिढीला त्याची जाणीव करून देण्यासाठी गुगल इंडियाने देखील पुढाकार घेतला आहे. आज पहिल्या टप्प्यातील मतदान असल्याने गुगलने डुडलद्वारे इंटरनेट युजर्सना मतदान करण्यासाठी आवाहन केले आहे.

या डुडलवर क्लिक केल्यानंतर लोकसभा निवडणुकीसंदर्भातील विविध प्रश्न आणि त्यांची उत्तरे आपल्याला वाचायला मिळतात. मतदान कोण करू शकतो, मतदान करताना कोणती ओळखपत्र ग्राह्य धरतात, मतदार यादीत आपले नाव कसे शोधणार? अशा विविध प्रश्नांची माहिती येथे मिळते.

दरम्यान, सोशल मीडियावर देखील मतदारांना मतदानासाठी बाहेर पडा असे आवाहन केले जात आहे. मतदानाचा टक्का वाढावा आणि लोकशाही अधिक मजबूत व्हावी यासाठीच असे उपक्रम राबवण्यात येत आहेत.