पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च सन्मान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
narendra-modi

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च सन्मान ‘सेंट ऍण्ड्रय़ू’ जाहीर झाला आहे. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याचे रशियन दूतावासातर्फे सांगण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच सौदी अरबने ‘जायद’ हा सर्वोच्च सन्मान देऊन गौरव केला. गेल्याच महिन्यात पंतप्रधान मोदी यांना दक्षिण कोरियाने ‘सेऊल शांतता पुरस्कार’ देऊन सन्मानित केले.

रशियानेही ‘सेंट ऍण्ड्रय़ू’ हा सन्मान पंतप्रधान मोदी यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी मंजुरी दिली. हिंदुस्थान व रशिया यांच्यातील मैत्रीसंबंध अधिक दृढ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे रशियन दूतावासाने स्पष्ट केले. हा पुरस्कार देण्यात येत असल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे आभार मानले आहेत. रशियन सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच हिंदुस्थानी पंतप्रधान आहेत. यापूर्वी हा सन्मान चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना देण्यात आला आहे.