मुख्यमंत्री 20 एप्रिलला गोव्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cm-devendra-fadnavis

सामना ऑनलाईन । पणजी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 एप्रिल रोजी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी एका दिवसाच्या गोवा दौऱ्यावर येत आहेत. 20 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांचे दाबोळी विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता उत्तर गोव्यातील साखळी येथे त्यांची पहिली जाहीर प्रचार सभा होणार आहे. सायंकाळी 6 वाजता दक्षिण गोव्यात मडगाव येथील लोहिया मैदानावर त्यांची दुसरी जाहीर प्रचार सभा होणार आहे. रात्री 8 वाजता वास्को मार्केटजवळ फडणवीस यांची शेवटची जाहीर प्रचार सभा होणार आहे.