
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
रत्नागिरीत कडक उन्हाचे चटके सहन करत असताना आज संध्याकाळी अचानक वातावरण बदलले. रत्नागिरी शहरात सायंकाळी वादळी वारे वाहू लागल्याने सर्वांची पळापळ सुरु झाली. आज सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. देवरूख शहरात पाऊस पडू लागला आणि त्याचवेळी रत्नागिरी शहर आणि किनारपट्टीवर वादळाचा तडाखा बसला.
वादळी वाऱ्यामुळे सर्वत्र धूळीचे लोट आणि पालापाचोळा पसरला. वातावरणात बदल होताच शहर परिसरातील विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आला.
तर दुसरीकडे सातारा वाई महाबळेश्वरमध्येही मेघ गर्जनांसह जोरदार पाऊस झाला आहे. गेल्या काही दिवसांपासुन उन्हाचा पारा वाढला होता. आज पाऊस आल्यामुळे सगळीकडे गारवा पसरला व यामुळे नागरिकांना उष्णतेपासून काही काळासाठी विश्रांती मिळाली.






























































