
सामना प्रतिनिधी । मालवण
आचरा समुद्र किनारी सायंकाळी समुद्राच्या लाटांबरोबर दोन मोठे कासव मृतावस्थेत किनाऱ्याला वाहत आले. पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी या कासवांना बघण्यासाठी मोठीच गर्दी केली होती. समुद्रातील प्रदुषणामुळे कासवांचा मृत्यू झाल्याची शक्यता स्थानिक मच्छीमारांनी व्यक्त केली आहे.
























































