वडाळ्यातील पोर्ट ट्रस्ट पादचारी पूल बंद; पादचाऱ्यांचे हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

सीएसएमटीला जोडणारा पादचारी पूल कोसळल्यानंतर मध्य रेल्वेने आता सर्वच जुने पादचारी पूल एकामागोमाग एक बंद करण्याचा सपाटा लावला आहे. पुलाच्या दुर्घटनेत पालिकेच्या अभियंत्याला थेट अटकच झाल्याने रेल्वेने कोणतीही रिस्क नको म्हणून कल्याण, दिवा, कुर्ला, भांडुप, विक्रोळी असे ब्रिटिशकालीन पादचारी पूल धडाधड बंद करीत तोडकाम सुरू केले आहे. सोमवारी वडाळय़ाचा पोर्ट ट्रस्ट पादचारी पूल बंद करण्यात आल्याने पूर्व ते पश्चिम जाणाऱ्या पादचाऱ्यांचे हाल झाले आहेत.