कबूतरखाने तोडू नका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

कबूतरखान्यांवर पालिकेकडून केली जाणारी कारवाई तत्काळ थांबवा, कबूतरखाने वाचवा, कबूतरांना दाणे टाकणाऱयांवर दंडाची कारवाई करू नका अशी मागणी भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

महापालिकेकडून महिनाभरापासून जुन्या कबूतरखान्यांवर कारवाई सुरू आहे. जुने कबूतरखाने उद्ध्वस्त केले जात आहेत. तसेच दाणे टाकणाऱयांना 500 रुपयांचा दंड लावला जात आहे. मुंबईतील गोलदेऊळ येथील ज्या गल्लीचे नाव कबूतर गल्ली आहे तेथील कबूरतखानाही पालिकेने उद्ध्वस्त केला आहे. त्याची गंभीर दखल घेत आमदार मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवारी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन निवेदन दिले.