हिमालय पूल दुर्घटना; जामिनासाठी दोघा इंजिनीयरचा सत्र न्यायालयात अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल दुर्घटनेला जबाबदार असलेल्या पालिकेच्या दोघा इंजिनीयर्सनी सुटकेसाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. अनिल पाटील आणि एस. एफ. काकुल्ते अशी अटक इंजिनीयर्सची नावे असून दंडाधिकारी न्यायालयाने यापूर्वीच त्या दोघांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

14 मार्चला सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले तर 31 जण जखमी झाले. ठेकेदार डी. डी. देसाई यांच्या कंपनीने तसेच पालिकेचे इंजिनीयर्स अनिल पाटील आणि एस. एफ. काकुल्ते यांनी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले व पूल सुरक्षित असल्याचा अहवाल सादर केला होता. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना अटक केली होती. याप्रकरणी गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार असून सरकारच्या वतीने ऍड. मंगेश आरोटे हे बाजू मांडणार आहेत.