
सामना ऑनलाईन । मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 22 एप्रिलला संगमनेर येथील जाणता राजा मैदानात संध्याकाळी सहा वाजता जाहीर सभा होणार आहे तर 23 एप्रिलला कल्याण व ठाण्यात निवडणूक प्रचार सभा होणार आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी ही सभा होईल. संगमनेरच्या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मंगळवारी ठाणे-कल्याण
कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे व ठाणे लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांच्या 23 एप्रिलला ठाणे व कल्याणध्ये प्रचार सभा होतील. कल्याण पूर्व येथील चक्की नाका येथील भव्य मैदानावर संध्याकाळी सहा वाजता तर ठाणे पश्चिम येथे रात्री आठ वाजता सभा होईल. उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही प्रचारसभांमुळे डॉ. श्रीकांत शिंदे व राजन विचारे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होईल.























































