
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
रिझर्व्ह बँकेकडून लवकरच 20 रुपयांची नवी नोट जारी करण्यात येणार आहे. नवीन वैशिष्ट्ये आणि नव्या रंगातील ही नोट चलनात येणार आहे. या नोटेचा फोटो आणि वैशिष्ट्ये याची माहिती रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली आहे. या नव्या नोटेचा रंग हिरवट पिवळा असेल. या नोटेवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी असणार आहे. या नोटेच्या मागील बाजूस हिंदुस्थानचा सांस्कृतिक वारसा असलेल्या वेरुळ लेणींचे चित्र असेल. खरी नोट ओळखता यावी यासाठी काही विशिष्ट चिन्हांचा आणि खुणांचा वापर या नोटेवर करण्यात आला आहे. तसेच 20 रुपयांच्या आताच्या नोटाही चलनात राहणार आहेत.
RBI: Reserve Bank of India will issue ₹ 20 denomination banknotes in the Mahatma Gandhi (New) Series. The base colour of the note is Greenish Yellow. All the banknotes in the denomination of ₹ 20 issued by the Reserve Bank in the earlier series will continue to be legal tender. pic.twitter.com/Gfc8OnE3fg
— ANI (@ANI) April 27, 2019
नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने 500 आणि 2000 रुपयांच्या नवीन नोटांसह 200 रुपये, 100 रुपये, 50 रुपये आणि 10 रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या आहेत. आता लवकरच 20 रुपयांची नवी नोट चलनात येणार आहे.






















































