
सामना प्रतिनिधी। खर्डी
कल्याण-कसारा मार्गावर ओव्हरहेड वायर तुटल्याने उन्हाच्या काहिलीने घामाघूम झालेल्या लोकल प्रवाशांचा आज पुरता ‘घामटा’ निघाला. खर्डी रेल्वे स्थानकाजवळ लोकल वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाल्याने प्रवाशांचा संयम सुटला. अखेर आसनगावहून कसाऱयाकडे विशेष लोकल सोडण्यात आल्याने प्रवाशांचा असंतोष कमी झाला. मात्र ‘रोज रडे त्याला कोण मरे’ या उक्तीनुसार मध्य रेल्वेच्या नेहमीच्या त्रासाला प्रवासी चांगलेच हैराण झाले आहेत.
खर्डी रेल्वे स्थानकाजवळ कसाऱ्याकडे जाणारी रेल्वे सेवा एक तास ठप्प झाल्याने राजधानी एक्सप्रेस व तीन इतर लांब पल्ल्याच्या गाडय़ा वासिंद ते आटगाव स्थानकावर उभ्या करण्यात आल्या होत्या. रेल्वे कर्मचाऱयांनी अथक परिश्रम करून दुरुस्ती काम पूर्ण केल्यावर 6 वाजता लोकल वाहतूक संथ गतीने सुरळीत सुरू करण्यात आली. त्यातच 6 वाजता कसाऱयाकडे जाणारी लोकल आसनगाव स्थानकात रद्द केल्याने प्रवासी चांगलेच संतापले होते. मात्र रेल्वे प्रशासनाने कसाऱयाकडे जाणारी विशेष लोकल सोडल्याने प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
तांत्रिक अडचणी दूर करा!
कसाऱयाकडे जाणाऱया लोकल वारंवार तांत्रिक बिघाडांमुळे रखडत असल्याने त्याची कायमस्करूपी दुरुस्ती करण्याची मागणी प्रवासी संघटनेचे राजेश घनघाक यांनी केली. या लोकल गोंधळाने नाशिककडे जाणाऱया प्रवाशांनी आसनगाव येथे उतरून मुंबई-आग्रा महामार्गावरून खासगी वाहने पकडून पुढे जाणे पसंत केले.






























































